व्यवसाय आणि उद्योग: समृद्धीचा नवा अध्याय
नाशिकची औद्योगिक परंपरा सदीश्रेष्ठ आहे. आता वेळ आली आहे या परंपरेला आधुनिक आयाम देण्याची.
आमचे वचन :
“नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉर 2.0″
- ३० दिवसांत उद्योग सुरू करण्याची सर्व परवानगी (सिंगल विंडो सिस्टम)
- लघु-मध्यम उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहन
- महिला उद्योजकांसाठी दुप्पट सवलती
नाशिक वाइन व्हॅली विस्तार
- सुला, यॉर्क यांच्यासारखे आणखी १०० वाइनरीज
- जागतिक पर्यटकांसाठी आकर्षक गंतव्य
- स्थानिक शेतकऱ्यांना प्रीमियम किंमत
निर्यात संवर्धन केंद्र
- नाशिकच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ
- प्रत्येक उत्पादकाला निर्यात प्रशिक्षण
- आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता प्रमाणन सुविधा