Slum

झोपडपट्टी सन्मान योजना : प्रतिष्ठेचे राहणे प्रत्येकाला

का राहावे गरिबीत जेव्हा आपल्याकडे अमाप साधन संपत्ती आहे? का राहावे झोपडपट्टीत जेव्हा आपल्याकडे अमाप नवोन्मेष आहे?

आपला राग न्याय्य आहे. आपली अपेक्षा योग्य आहे!

प्रत्येक माणूस सन्मानाने जगण्यास पात्र आहे. गरीबी ही दैवी शिक्षा नाही – ही संधीची कमतरता आहे!

स्वाभिमानी नाशिक” – झोपडपट्टी मुक्त नाशिक:

स्वाभिमान गृह योजना

  • प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला पक्के घर
  • मुबलक विद्युत, पाणी, स्वच्छता
  • मालकी हक्क – कायमस्वरूपी!
  • ५ वर्षांत ८०,००० स्वाभिमान गृहे

गरीबी उन्मूलन” – समृद्धी सृजन

  • कौशल्य विकास = हमीशाहीर रोजगार
  • लघु व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज
  • महिला बचत गट = आर्थिक स्वातंत्र्य
  • झोपडपट्टीतून बंगला बनवू शकतो आपला प्रत्येक नागरिक!”

शिक्षण हेच तारणहार

  • झोपडपट्टीतील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण (१२वी पर्यंत)
  • IIT-JEE, NEET साठी मोफत कोचिंग
  • प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
  • गरिबीत जन्म आपल्या हातात नाही, पण त्यावर मात करणे आपल्या हातात आहे!”

आर्थिक सबलीकरण

  • स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र प्रत्येक वस्तीत
  • बाजार जोडणी – उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत
  • सहकारी संस्था निर्मिती
  • बँकिंग सुविधा दाराशी

झोपडपट्टी ही समस्या नाही – ती आपली जबाबदारी आहे!

कोणालाही गरिबीत जगण्यास भाग पाडणे हा शासनकर्त्यांवर अपयशाचा डाग आहे! आम्ही तो दूर करू! – संधी देऊ समृद्ध करू!”

Scroll to Top